नगरची १ लाख करोनाबाधितांच्या दिशेने वेगाने वाटचाल, ॲक्टीव्ह रुग्ण संख्या ८ हजारांहून अधिक

 *दिनांक ०२ एप्रिल, २०२१*


*आज ६४५ रूग्णांना डिस्चार्ज तर  नव्या १८०० बाधितांची रुग्ण संख्येत भर*

 

*रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.२४ टक्के*अहमदनगर: जिल्ह्यात आज ६४५ रुग्णांना  रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ८८ हजार ४७३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९०.२४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १८०० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ८३३५ इतकी झाली आहे.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ४३४, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ८८२ आणि अँटीजेन चाचणीत ४८४ रुग्ण बाधीत आढळले.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १८६, अकोले १६, जामखेड ०१, कोपरगाव २३, नगर ग्रामीण २३, नेवासा १३, पारनेर १३, पाथर्डी ५३, राहता ०१, राहुरी १०, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०४, श्रीरामपूर २१,  कॅंटोन्मेंट बोर्ड ६८ आणि  इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.


खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २४२, अकोले २०, जामखेड ०३, कर्जत ०७, कोपरगाव ८५, नगर ग्रामीण ६२, नेवासा २४,  पारनेर २२, पाथर्डी १९, राहाता १३८,  राहुरी ४२, संगमनेर ६७, शेवगाव ३३, श्रीगोंदा ०६, श्रीरामपूर ७४, कॅंटोन्मेंट ०५ आणि इतर जिल्हा ३३ अशा रुग्णांचा समावेश आहे.


अँटीजेन चाचणीत आज ४८४ जण बाधित आढळुन आले. मनपा २८, अकोले २६, जामखेड ४०, कर्जत ६६, कोपरगाव ०२, नगर ग्रामीण २२, नेवासा ३५, पारनेर १६, पाथर्डी ६४,  राहाता ६९, राहुरी ३५, संगमनेर ०४, शेवगाव ०३, श्रीगोंदा २६,  श्रीरामपूर ३९, कॅंटोन्मेंट बोर्ड ०८ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.


दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये

मनपा २२५, अकोले १८, जामखेड १८, कर्जत १७,  कोपरगाव ५३, नगर ग्रामीण ३३, नेवासा १४, पारनेर ३८, पाथर्डी १७, राहाता ५०, राहुरी १५, संगमनेर ५९,  शेवगाव २१,  श्रीगोंदा ०२,  श्रीरामपूर ५५, कॅन्टोन्मेंट ०६ आणि इतर जिल्हा १३ अशा रुग्णांचा समावेश आहे.


*बरे झालेली रुग्ण संख्या:८८४७३*


*उपचार सुरू असलेले रूग्ण:८३३५*


*मृत्यू:१२३३*


*एकूण रूग्ण संख्या:९८०४१*


(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)


*घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा*


*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा*


*स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या*


*अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा*

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post