शरद पवार यांच्या भूमिकेचीही चौकशी करण्याची गरज, हायकोर्टात याचिका दाखल

शरद पवार यांच्या भूमिकेचीही चौकशी करण्याची गरज, हायकोर्टात याचिका दाखल मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्ब संदर्भात हायकोर्टात आणखी एक याचिका दाखल करण्यात आली आहे. यासंपूर्ण प्रकरणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेचीही चौकशी करण्याची गरज असल्याचा उल्लेख नव्याने दाखल करण्यात आलेल्या याचिकेत करण्यात आला आहे.  90 वर्षीय निवृत्त आयपीएस अधिकारी जुलियो रिबेरो यांच्यामार्फत चौकशीचा सल्ला देण्यामागे शरद पवारांचा नेमका हेतू काय होता? असा सवाल या याचिकेतून विचारण्यात आला आहे.


घनश्याम उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली आहे. लवकरच या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. तसेच या प्रकरणाची सीबीआय किंवा ईडीमार्फत चौकशी करण्याचे निर्देश देण्याची मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे. दरमहा 100 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप असल्याने पीएमएलए अंतर्गत सर्व संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या संपत्तीवर जप्तीचीही याचिकेत मागणी करण्यात आली आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post