अखिल भारतीय मेहतर समाज संघटना तर्फे वडारवाडी ग्रामपंचायतला आंदोलनाचा ईशारा..

 अखिल भारतीय मेहतर समाज संघटना तर्फे वडारवाडी ग्रामपंचायतला आंदोलनाचा ईशारा..

मौजे वडारवाडी  ग्रामपंचायत 

कार्यालय ता.जिल्हा अहमदनगर हद्दीतील साई कॉलनी येथील रहिवाशी यांनी त्यांचे घरातील सांडपाणी यशवंतनगर कडे जाणाऱ्या दलित वस्ती मध्ये सोडण्यात आले आहे ,आदि या विषयावर वडारवाडी ग्रामपंचायत मध्ये वारंवार तोंडी, लेखीअर्ज तक्रार देऊनही ग्रामपंचायतनी  कोणतीही दखल घेतली नाही . सांड पाणी दूषित असल्यामुळे यशवंतनगर येथील नागरिकांना आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे .साई नगर कॉलनी रहिवासी यांनी दलित वस्ती कडे  जाणाऱ्या रस्त्यावर सांडपाणी सोडणे हा कायदेने गुन्हा आहे तरी वडारवाडी ग्रामपंचायत यांनी  त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी . येत्या 15 दिवसाच्या आत कारवाई न केल्यास व तेथील सांडपाण्याची सोय लवकरात लवकर न केल्यास संघटना व यशवंतनगर येथील  नागरिकांच्या वतीने वडारवाडी ग्रामपंचायत मध्ये आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे .या विषयावर आज वडारवाडी ग्रामपंचायत चे ग्रामविकास अधिकारी संजय अर्जुन वाघ यांना निवेदन देण्यात आले यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनी भैय्या खरारे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल लखन, सामाजिक कार्यकर्ते ईश्वर जगताप, तुषार धावडे, रफिक भाई मोगल ,राजू भोसले, पवन सेवक, धीरज बैद, प्रवीण वाघमारे आदि यशवंतनगर गावातील नागरिक उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post