शिक्षक सभासदांच्या खात्यावर ८.२५ टक्के प्रमाणे कायम ठेवीवरील विक्रमी व्याज वर्ग

 शिक्षक सभासदांच्या खात्यावर आज ८.२५ टक्के प्रमाणे कायम ठेवीवरील विक्रमी व्याज होणार वर्ग..१७.५० कोटी रकमेचे होणार वाटप


आज एकतीस मार्च...गेल्या पाच वर्षापूर्वी शिक्षक बँकेत  गुरुमाऊली मंडळाची सत्ता आली आणि त्याच वर्षापासून शिक्षकांच्या कायम ठेवीवर व्याज लगेच 31 मार्चला संध्याकाळी जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला..या पूर्वी कायम ठेवीचे व्याज हे ५/६ महिन्यानंतर सर्वसाधारण सभा झाल्यानंतर वर्ग केले जायचे. परंतु सभासद हित लक्षात घेऊन गुरुमाऊली मंडळ व संचालक मंडळाने दर वर्षी 31 मार्चला कायम ठेवीवरील व्याज सातत्याने जमा केले आहे.

 आज रात्री पर्यंत सर्व सभासदांच्या खात्यावर कायम ठेवीवर ८.२५ टक्के प्रमाणे विक्रमी व्याज जमा होणार आहे. गुरुमाऊली मंडळाच्या सभासद हिताचा आणि काटकसरीच्या कारभाराचा सभासदांना सर्वात मोठा लाभ या रकमेमुळे होणार आहे. गेल्या महिनाभरापासून फेब्रुवारी आणि मार्च चे पगार प्रलंबित असल्यामुळे निश्चितच या व्याजामुळे शिक्षकांची आर्थिक समस्या सुटणार आहे.  गुरुमाऊली मंडळाच्या आम सभेत जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या मागणीचा विचार करून श्री बापूसाहेब तांबे व राजकुमार साळवे यांच्या आदेशानुसार कायम ठेवीवर विक्रमी व्याजदर देण्याचा यापूर्वी निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याची आज अंमलबजावणी होत आहे. याचा विशेष आनंद चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ  व गुरुमाउली मंडळाचे पदाधिकाऱ्यांना आहे...0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post