अर्बन बँकेतील 22 कोटींच्या अपहाराचे प्रकरण, पोलिसांकडून अटकसत्र

 अर्बन बँकेतील 22 कोटींच्या अपहाराचे प्रकरण, पोलिसांकडून अटकसत्रनगर : नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या पिंपरी चिंचवड शाखेतील 22 कोटींच्या कर्ज फसवणुक प्रकरणात पोलिसांनी अटकसत्र सुरु केले आहे. पिंपरी-चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी पहाटे नगर शहरात छापा टाकून बँकेच्या एका संचालकाला ताब्यात घेतले आहे. गुन्ह्यात आरोपी असलेल्या इतर संचालकांचाही शोध सुरू आहे. कर्ज प्रकरणात मिळकतीचे बनावट मूल्यांकन सादर करून नगर अर्बन को. ऑप. बॅकेच्या चिंचवड शाखेची 22 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. 

याप्रकरणी कर्ज उपसमिती सदस्य, बँकेचे संचालक मंडळ सदस्यांसह आणखी सहा जणांच्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. बबन निवृत्ती चव्हाण, वंदना बबन चव्हाण, यज्ञेश बबन चव्हाण (तिघेही रा. संभाजीनगर, चिंचवड), मंजुदेवी हरीमोहन प्रसाद (रा. शाहूनगर, चिंचवड), रामचंद्र अण्णासाहेब तांबिले (रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), अभिजित नाथा घुले (रा. बुरूडगाव रोड, अहमदनगर), कर्ज उपसमितीचे सदस्य, नगर अर्बन को. ऑप. बॅकेचे संचालक मंडळ सदस्य अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी बँकेचे अधिकारी महादेव पंढरीनाथ साळवे यांनी  पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी कर्ज घेणार्‍या एकास शुक्रवारी अटक केली आहे. या गुन्ह्यात बँकेचे संचालक मंडळही आरोपी असल्याने त्यांच्या शोधासाठी पिंपरी-चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेतील पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांचे पथक शनिवारी पहाटेच नगरमध्ये दाखल झाले. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post