महसूलमंत्र्यांच्या कन्येचे बनावट फेसबुक खाते उघडून पैशाची मागणी

महसूलमंत्र्यांच्या कन्येचे बनावट फेसबुक खाते उघडून पैशाची मागणी

 


नगर : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कन्या डॉ. जयश्री थोरात यांच्या नावाने फेसबुकचे बनावट खाते उघडून गुगल पे, फोन पे याद्वारे पैशाची मागणी केली जात असल्याचा प्रकार समोेर आला आहे. याप्रकरणी सिद्धार्थ सुभाष थोरात यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हे बनावट खाते बंद करून खोडसाळपणा करणाऱ्यांवर कारवाई करावी, असे तक्रारीत म्हटले आहे.

अज्ञात व्यक्तीने डॉ. जयश्री यांच्या नावाने फेसबुकवर बनावट खाते उघडले. १ ते २ मार्चच्या कालावधीत रात्री दहा वाजण्याच्या सुमारास या बनावट खात्याद्वारे त्याने काहींना संदेश पाठवून गुगल पे व फोन पे याद्वारे पैशाची मागणी केली. फेसबुक पेजवर मंत्री बाळासाहेब थोरात व कन्या डॉ. जयश्री यांचा फोटो वापरण्यात आला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर सिद्धार्थ थोरात यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post