Tata आणि Mahindra च्या ‘या’ गाड्यांवर 3 लाखांची सवलत

Tata आणि Mahindra च्या गाड्यांवर 3 लाखांची सवलत Tata Motors आणि Mahindra & Mahindra कंपनीच्या कार्सवर बम्पर डिस्काऊंट देण्यात आला आहे. ही ऑफर केवळ मार्च महिन्याच्या अखेपर्यंत सुरु असेल. या ऑफरमध्ये काही निवडक वाहनांचा समावेश करण्यात आला आहे.  Mahindra Alturas G4 या कारवर 3.02 लाख रुपयांची शानदार डिस्काउंट ऑफर सादर करण्यात आली आहे. यामध्ये 2.2 लाख रुपयांचा कॅश डिस्काउंट आणि इतर ऑफर्सचा समावेश आहे.टाटा हॅरियर या कारवर एकूण 70,000 रुपयांचा डिस्काउंट देण्यात आला आहे, ज्यामध्ये 40,000 रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंट, 25,000 रुपयांची कन्ज्युमर ऑफर आणि 5,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट देण्यात आला आहे. Mahindra XUV 500 या कारवर 80,800 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट देण्यात आला आहे. ज्यामध्ये 36,800 रुपयांचा कॅश डिस्काउंट आणि इतर बेनिफिट ऑफरही आहेत.टाटा नेक्सॉनच्या डिझेल इंजिन मॉडलवर 20,000 रुपयांचा डिस्काउंट देण्यात आला आहे. ज्यामध्ये 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5,000 रुपयांच्या कॉर्पोरेट डिस्काऊंट देण्यात आला आहे. तर टाटा नेक्सॉन EV च्या Lux आणि XZ+ मॉडल्सवर 15,000 आणि 10,000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post