शिवसैनिकांनी हाती घेतला काँग्रेसचा झेंडा

 शिवसैनिकांनी हाती घेतला काँग्रेसचा झेंडा ;

शहराला किरण काळेंच्या निर्भिड नेतृत्वाची गरज : लखन छजलानीप्रतिनिधी : हिंदूधर्मरक्षक स्व.अनिलभैय्या राठोड हे आमच्या सारख्या सामान्य शिवसैनिकांचे दैवत होते. त्यांच्या अकाली निधनाने सामान्य शिवसैनिक पोरके झाले आहेत. शिवसैनिक अनिलभैय्यांना कदापी विसरू शकत नाहीत. पण आता नगर शहराला किरण काळेंच्या निर्भिड नेतृत्वाची गरज आहे, असे प्रतिपादन लखन छजलानी यांनी केले आहे. 

छजलानी यांच्यासह अनेक सामान्य शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा झेंडा हाती घेत पक्षामध्ये प्रवेश केला. त्यावेळी छजलानी बोलत होते. यावेळी काँग्रेसचे उपाध्यक्ष खलील सय्यद, अनंतराव गारदे, निजाम जहागीरदार,खजिनदार मोहनराव वाखुरे, सचिव प्रशांत वाघ, सहसचिव गणेश आपरे, युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड.अक्षय कुलट, क्रीडा विभाग अध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

किरण काळे म्हणाले की, लखन छजलानी आणि तरुण शिवसैनिकांनी माझ्या नेतृत्वावर विश्वास दाखवत काँग्रेसमध्ये केलेला प्रवेश ही माझी जबाबदारी वाढविणारा आहे. स्व.अनिलभैय्यांच्या कार्यकर्त्यांना मी कधीही निराश करणार नाही. त्यांच्या पाठीशी मोठ्या भावाप्रमाणे खंबीरपणे उभा राहील.  यावेळी छजलानी यांच्यासह शरद दिवटे, हर्षल नकवाल, करण उदास, तरुण चव्हाण, जितू छजलानी, सोनू संगत, राम छजलानी, परेश बधवणे, शुभम छजलानी, आकाश कदम, रितेश छजलानी, रितिक परदेशी, योगेश बासोडे, हर्षल वाकडे आदी सामान्य शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post