पंढरपूरमध्ये प्रा.राम शिंदे विरूद्ध पार्थ पवार लढतीची चर्चा

 पंढरपूरमध्ये प्रा.राम शिंदे विरूद्ध पार्थ पवार लढतीची चर्चापंढरपूर : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना रंगणार असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपकडून माजी मंत्री राम शिंदे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाणार असल्याची चर्चा आता मतदारसंघात पाहायला मिळत आहे.

भाजप प्रभारींनी बैठक घेत उमेदवार घोषित करणार असल्याचं सांगितलं. भाजपकडून विधान परिषद सदस्य प्रशांत परिचारक यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. असं असताना आता माजी मंत्री आणि कर्जत-जामखेड विधानसभा निवडणुकीत रोहित पवारांविरोधात पराभव स्वीकारावा लागलेले डॉ. राम शिंदे यांचंही नाव भाजपकडून पुढे केलं जात आहे.

दुसरीकडं राष्ट्रवादी काँग्रेसनेही अद्याप या मतदारसंघात उमेदवार निश्चित केलेला नाही. दिवंगत आमदार भारत भालके यांच्या कुटुंबातील सदस्य उमेदवार असेल असे सांगितले जाते आहे. परंतु पक्षाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्याही नावाची चर्चा आहे. तशी वातावरण निर्मितीही मतदार संघात होते आहे.

पंढरपूर-मंगळवेठा विधानसभा मतदारसंघात धनगर समाजाचं प्राबल्य आहे. त्यामुळे राम शिंदे यांना उमेदवारी देत भाजप जातीचं समीकरण जुळवण्याच्या आणि मतदारसंघात विजय मिळवण्याच्या विचारात असल्याचं बोललं जात आहे. राम शिंदे यांच्या नावाला जिल्ह्यातील भाजपचे नेते माजी मंत्री सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांची अनुकूलता असल्याचं बोललं जात आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post