महाराष्ट्रातील घडामोडींवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे मोठं वक्तव्य...ठाकरे सरकारने...

महाराष्ट्रातील घडामोडींवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे मोठं वक्तव्य...हा नैतिकतेचा प्रश्न आहेमुंबई  -केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे माजी अध्यक्ष अमित शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात गाजत असलेल्या सचिन वाझे आणि परमबीर सिंग यांच्या पत्र प्रकरणावरून अमित शहांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा यांनी महाराष्ट्र पोलिसातील वसुली प्रकरणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांना आपण कुठलाही सल्ला देणार नाही. पण हा नैतिकतेचा प्रश्न आहे आणि त्यांनी विचार केला पाहिजे, असे अमित शहा म्हणाले.

महाराष्ट्रचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री आणि राज्यपालांना पत्र लिहित गंभीर आरोप केले आहेत. गृहमंत्री देशमुख यांनी महिन्याला १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट पोलिसांना दिले, असा आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. 'हा प्रश्न फक्त पोलीस आयुक्तांचा नाही. तर इतर निरीक्षकांनीही केंद्र सरकारला पत्र लिहिली आहेत. पण मी सध्या निवडणुकीच्या प्रचारात व्यग्र आहे', असे अमित शहा म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी जो अहवाल दिला आहे तो आपण आरामात बघू. पण हा नैतिकतेचा प्रश्न आहे. आणि महाराष्ट्र सरकारने आपली नैतिकता दाखवली पाहिजे, असे शहा म्हणाले. अनिल देशमुखांना गृहमंत्रीपदावरून हटवण्याच्या प्रश्नावरही शहांनी उत्तर दिले. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कुठलाही सल्ला देणार नाही. पण हा प्रश्न नैतिकतेचा आहे. त्यांनी विचार केला पाहिजे, असे शहा म्हणाले. शरद पवारांना काही सल्ला देणार का? असे विचारल्यावर शहांनी नकार दिला. अमित शहा यांनी 'आज तक' या वृत्तवाहिनीला यासंदर्भात मुलाखत दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post