मोठी बातमी....जिल्ह्यात शाळा पुन्हा बंद करण्याचा निर्णय
नगर : लसीकरणासाठी केंद्र सरकारने वयाची अट काढून टाकावी तसेच लसीकरण बंधनकारक करावे अशी मागणी नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. लॉकडाऊनबाबत राज्य सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नसून नगर जिल्ह्यात राज्य शासनाच्या सूचनेनुसार विविध उपाययोजना करण्यात येत आहे, असेही पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
जिल्ह्यात रेमडेसीवीरचा साठा कमी असून हा साठा मिळण्याबाबत वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरु आहे. नागरिकांनी, लोकप्रतिनिधींनी मास्क वापर, गर्दी टाळणे या नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी करोना प्रतिबंध उपाययोजनांबाबत सांगितले की, दहावी व बारावी वगळता सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत गर्दी टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व हॉटेल, रेस्टॉरंट रात्री आठनंतर पूर्ण बंद राहणार आहे. कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेवून पुढील 100 दिवसांचे नियोजन करण्यात आले आहे.
Post a Comment