पोलिस प्रशासन व महापालिका कर्मचाऱ्यांना २ हजार सॅनिटायझर बॉटल

 आ.अरुणकाका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा पोलिस प्रशासन व महापालिका कर्मचाऱ्यांना २ हजार सॅनिटायझर बॉटलचे वाटप
नगर : गेल्या एक वर्षापासून कोरोना संसर्ग विषाणू आजारामुळे मनुष्य जीवन भयभीत झाला आहे. या संसर्ग विषाणूच्या काळात माणूस माणसापासून लांब गेला आहे. तरीही प्रशासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य पार पाडले. पोलिस प्रशासनाने तर २४ तास या काळामध्ये नागरिकांच्या संरक्षणाबरोबरच त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी रस्त्यावर उभे राहिले. याचबरोबर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनीही दैनंदिन स्वच्छतेच्या कामकाजाबरोबरच विकासाचे काम करण्यासाठी पुढे येत होते. कॅन्टोन्मेंट झोन असतानाही महापालिकेचे पाणीपुरवठा, सफाई व दिवाबत्ती करणारे कर्मचारी झोनमध्ये जाऊन काम करत होते. कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळेच आज आपण सर्वजण सुरक्षित आहोत. यासाठी आपणही त्यांचे आरोग्य अबादीत राहण्यासाठी त्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे. माझ्या  वाढदिवसानिमित्त २ हजार सॅनिटायझरच्या बॉटलचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम मयूर शेटीया, राजेश भंडारी व गणेश गोंडाळ यांनी केल्याबद्दल मी त्यांचा क्रणी आहे, असे प्रतिपादन आ. अरुणकाका जगताप यांनी केले. 
आ.अरुणकाका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा पोलिस प्रशासन व महापालिका कर्मचाऱ्यांना २ हजार सॅनिटायझर बॉटलचे वाटप करण्यात आले. यावेळी मयूर शेटीया, राजेश भंडारी, गणेश गोंडाळ, शहर पोलिस उपाधीक्षक विशाल ढुमे, महापालिका कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन बाबासाहेब मुदगल, व्हा. चेअरमन विकास गिते, मनीष फुलढाळे, विजय फुलसौंदर, दिनेश जोशी आदी उपस्थित होते. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post