केडगाव येथील सुभाष महाराज सुर्यवंशी यांचे निधन

केडगाव येथील सुभाष महाराज सुर्यवंशी यांचे निधन केडगाव : केडगाव येथील माऊली प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष महाराज सुर्यवंशी यांचे दुखद निधन झाले . ते ६२ वर्षांचे होते .आखिल भारतीय वारकरी मंडळाच्या राज्य समितीवर नुकतीच त्यांची निवड झाली होती .केडगावमध्ये धार्मिक कार्यक्रम , अखंड हरिनाम सप्ताह पारायण  सोहळ्याचे गेल्या 20वर्षा पासून आयोजन करत होते.ह्या वर्षी करोना प्रादुर्भावा मुळे त्यांनी स्वतःच्या राहत्या घरी राहून अखंड हरिनाम चा 7 दिवस गजर केला. व पंढरपुर दिंडी आयोजनात त्यांचे मोलाचे योगदान होते .आपल्या पहाडी आवाजातील किर्तनाने ते भाविकांना ते मंत्रमुग्ध करीत . त्यांच्या मागे पत्नि , मुलगा , मुलगी सुन, जावई नातवंडे , बंधू असा मोठा परिवार आहे . त्यांच्या निधनाने केडगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post