स्व.अनिलभैय्या राठोड यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

 स्व.अनिलभैय्या राठोड यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन     नगर - नगर शहराचे माजी आमदार स्व.अनिलभैय्या राठोड यांच्या जयंतीनिमित्त शहर शिवसेनेच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त नागरिकांची आरोग्य तपासणी, मोफत शिवभोजन थाळी, रक्तदान शिबीर, टोप्यांचे वाटप, चारा वाटप आदि कार्यक्रम दि.10 ते 15 मार्च 2021 दरम्यान करण्यात येणार असल्याची माहिती शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी दिली.

     यामध्ये दि.10 रोजी स.10 वा.सर्वरोग निदान शिबीर - चितळे रोड, सायं. 7 वा. अनामप्रेम संस्थेस स्नेहभोजन, दि.11 रोजी 10.30 वा. सर्वरोग निदान शिबीर प्राईम केअर हॉस्पिटल, एकविरा चौक, सावेडी, 11.30 वा. मातोश्री वृद्धाश्रम येथे स्नेहभोजन, विळदघाट, दु.12.30 वा. कुष्ठधाम येथील रुग्णांना फळे वाटप, सायं. 5.30 वा. डॉन बॉस्को संस्थेस स्नेहभोजन. दि.12 रोजी 10 वा. मोफत नेत्र तपासणी अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर, श्री साई हॉस्पिटल, चितळेरोड, स.10.30 वा. सर्वरोग निदान शिबीर नवीन मराठी शाळा, नवीपेठ, स. 10 वा. रक्तदान शिबीर, जिल्हा वाचनालय, चितळे रोड, स.11 वा.महाप्रसाद, शिवालय, चितळेरोड, 11 वा. टोपी वाटप, शिवालय, 12 वा. शहरातील सर्व शिवथाळी केंद्रावर मोफत जेवण. दु. 1 वा. पांजरपोळ येथे चारा वाटप. दि. 13 रोजी स.11 वा. आनंद अपंग कल्याण केंद्र स्नेहभोजन, दु. 11.30 वा. सफाई कामगारांना साड्या वाटप, केडगांव, दु. 12.30 वा. गो-शाळेस चारा वाटप, इसळक, दु. 1 वा. मनोविकलांगांना स्नेहभोजन, मानगाव. दि. 14 रोजी स. 10 वा. मुकबधीर विद्यालयात स्नेहभोजन, टिळक रोड, स.10 वा. सर्वरोग निदान शिबीर, शिवांजली मंगल कार्यालय, भुषणनगर, स. 11 वा. रिमांड होम संस्थेस स्नेहभोजन, दि. 15 रोजी स. 11 वा. स्त्री रोग निदान शिबीर, सरस्वती हॉस्पिटल, माळीवाडा आदि कार्यक्रम आयोजित केले आहे.

     या उपक्रमासाठी शिवसेनेचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी, महिला आघाडी, शिवसैनिक प्रयत्नशील आहेत. तरी सर्व शिवसैनिकांनी या सर्व कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन  दिलीप सातपुते यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post