रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

 


जामखेड : वंजारवाडी येथे रविवारी सायंकाळी शेतात काम करीत असलेल्या शेतकऱ्यावर रानगव्याने हल्ला केला. यामध्ये शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. रानगवा आल्याचे समजताच ग्रामस्थांनी त्याचा पाठलाग केल्याने तो पळून गेला. संतोष दराडे, असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे.ग्रामस्थांनी गव्याच्या हल्ल्यात जखमी झालेला शेतकरी संतोष दराडे यांना फक्राबाद येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. फक्राबाद येथील पोलीस पाटील योगीनाथ जायभाय यांनी घटनेची माहिती तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना दिली. त्यांनी तातडीने वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश छबीलवार यांना माहिती देऊन या भागात वन विभागाचे पथक पाठविण्यास सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post