क्रिकेट सामन्यांवर सट्टा घेणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश, 33 जणांना बेड्या
पुणे- सध्या भारत आणि इंग्लंड दरम्यान वनडे सीरीज खेळवली जात आहे. दरम्यान या सामन्यांवर मोठ्या प्रमाणात सट्टेबाजी करण्यात आली आहे. याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी धडक कारवाई करत पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात अनेक ठिकाणी छापे टाकले आहे. काल रात्री उशीरा केलेल्या छापेमारीत पोलिसांनी क्रिकेट सामन्यांवर सट्टा घेणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सुमारे 33 जणांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून मोठा मुद्देमाल आणि रोख रक्कम जप्त केली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. शुक्रवारी संध्याकाळी भारत आणि इंग्लंड दरम्यान दुसरा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला. या सामन्यात दोन्ही संघाकडून धावांचा पाऊस पाडण्यात आला. या चुरसीच्या झालेल्या सामन्यात मोठ्या प्रमाणात सट्टेबाजी होतं असल्याची माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांना मिळाली त्यामुळे पोलिसांनी रात्री उशिरा पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील विविध ठिकाणी छापेमारी केली आहे. रात्री उशिरा केलेल्या या कारवाईत भोपळचा भोलू आणि नागपूरचा चेतन उर्फ सोनू या मुख्य बुकींसह 33 बुकींना अटक केली आहे.
या क्रिकेट सट्टेबाजीमागे असलेलं आंतरराष्ट्रीय कनेक्शनही समोर आलं आहे. यावेळी पोलिसांनी धडक कारवाई करत पोर्तुगाल आणि गोव्यातील बुकिंनांही अटक केली आहे. या बुकिंकडून सुमारे 72 मोबाईल फोन, दोन दुर्बिणी, लॅपटॉप असा मोठा मुद्देमाल आणि रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे.
Post a Comment