दिव्यांग शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गास ७ वा वेतन आयोग

 दिव्यांग शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गास ७ वा वेतन आयोग मुंबई : राज्यातील दिव्यांग शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गास राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात 'गुड न्यूज' दिली आहे. विधानपरिषदेतील प्रश्नोत्तराच्या तासात धनंजय मुंडेंनीदिव्यांग शाळेतील शिक्षक-कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग लागू करण्याची अंमलबजावणी दोन महिन्यांच्या आत करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. आ. डॉ. सुधीर तांबे, आ. शरद रणपिसे, आ. भाई जगताप, आ. जयंत पाटील, आ. कपिल पाटील, आ. विक्रम काळे, यांसह विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी याबाबत विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post