राज्यातील राजकारणात मोठ्या बदलाचे वारे....शरद पवार व अमित शहांच्या गुप्त भेटीची चर्चा

राज्यात सत्तासमीकरणे बदलणार? शरद पवार व अमित शहांच्या गुप्त भेटीची चर्चा अहमदाबाद: सचिन वाझे, मनसुख हिरेन प्रकरणांमुळे ठाकरे सरकार अडचणीत आलं आहे. भारतीय जनता पक्षानं गेल्या महिन्याभरापासून महाविकास आघाडी सरकारला सातत्यानं अडचणीत आलं आहे. दुसरीकडे गुजरातमध्ये महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी अहमदाबादमध्ये एका बड्या उद्योगपतीची भेट घेतली. हा उद्योगपती भाजपचा निकटवर्तीय मानला जातो. या भेटीचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अहमदाबादमधील एका फार्महाऊसवर २६ मार्चला रात्री ९.३० वाजता पटेल आणि बड्या उद्योगपतीची भेट झाली. विशेष म्हणजे ही भेट होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारदेखील गुजरातमध्येच होते. मात्र ते या बैठकीला उपस्थित होते का, हे समजू शकलेलं नाही. याशिवाय शरद पवार, प्रफुल्ल पटेल यांची भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत गुप्त बैठक झाल्याचं वृत्त दिव्य भास्कर या वृत्तपत्रानं दिलं आहे. या भेटीसाठी पटेल आणि पवार प्रायव्हेट जेटनं शांतिग्राममधल्या गेस्टहाऊसला आले असल्याचा दावा वृत्तात करण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post