शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल  मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. रविवारी संध्याकाळी त्याच्या पोटात दुखल्यामुळे थोडासा अस्वस्थपणा जाणवत होता, म्हणूनच तपासणीसाठी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आले. निदान झाल्यानंतर, त्यांच्या पित्ताशयामध्ये एक समस्या असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिली. नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती दिली. वैद्यकीय तपासणीनंतर सध्या, कुठलिही औषधे न घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी पवार यांना दिला आहे. पुढील उपचारासाठी 31 मार्च रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येणार असून एन्डोस्कोपीनंतर त्यांच्यावर आवश्यक त्या सर्जरी करण्यात येतील. तोपर्यंत त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post