पवार-शहा भेटीबाबत चंद्रकांत पाटील यांचे मोठं वक्तव्य...तर गेल्यावेळेप्रमाणे शपथविधीनंतरच कळेल

पवार-शहा भेटीबाबत चंद्रकांत पाटील यांचे मोठं वक्तव्य..पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार  आणि भाजपचे अमित शाह  यांच्या कथित भेटीच्या वृत्तानंतर भाजपच्या नेत्यांनी सूचक वक्तव्ये करायला सुरुवात केली आहे. भाजप आणि राष्ट्रवादीचं काही ठरलंच तर गेल्यावेळसारखं शपथविधी झाल्यावर कळेल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील  यांनी म्हटले. कार्यकर्त्यांमध्ये भाजप-राष्ट्रवादी एकत्र येणार आहे, अशी चर्चा असल्याच्या प्रश्नावर त्यांनी हे सूचक विधान केले. 

ते सोमवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांना शरद पवार आणि अमित शाह यांच्या 26 मार्चला अहमदाबादमध्ये झालेल्या कथित भेटीविषयी प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी राजकारणात अशा भेटी झाल्या पाहिजेत, असे म्हटले. राजकारण हे राजकारणाच्या जागी असतं. मात्र, नेत्यांनी एकमेकांना भेटलं पाहिजे. अलीकडच्या काळात महाराष्ट्रात महाविकासआघाडीचे सरकार आल्यापासून अशा भेटीगाठी कमी झाल्या होत्या. अमित शाह आणि शरद पवार यांची भेट राजकीय कारणासाठी होते, असे नाही. त्यामागे एखादे समाजोपयोगी कारणही असू शकते, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post