१०० कोटींच्या खंडणीचा 'मास्टरमाईंड' शोधावा, पवारांच्या एकेकाळच्या निकटवर्तीय नेत्याची मागणी

 अनिल देशमुखांना अनेक वर्षांपासून ओळखतो, ते असं वागतील असे कधी वाटले नाही : आ.बबनराव पाचपुतेनगर : राज्याचे असलेल्या गृहमंत्री अनिल देशमुख यांना मी ओळखतो, ते असे वागतील असे वाटत नव्हते. मंत्रीच पैसे मागू लागले, तर इतरांना काय नावे ठेवणार, असा सवाल करीत भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांनी शंभर कोटी रुपयांच्या कथीत खंडणीचा मास्टरमाईंड कोण, याची चौकशी करण्याची मागणी केली. 

खंडणीचा आरोप झालेल्या गृहमंत्री देशमुख यांनी राजीनामा द्यावा, तसेच केंद्राने हस्तक्षेप करीत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, या मागण्यांसाठी भाजपतर्फे श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. त्यावेळी बोलताना पाचपुते म्हणाले, ""सरकार चालवून लोकांची सेवा करण्यापेक्षा गल्लाभरू राजकारण मंत्र्यांनी सुरू केले आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके असणारी मोटर उभी केली जाते. ज्याने उभी केली, त्यालाच तपास दिला जातो. अंबानी यांच्याकडून कोट्यवधीची खंडणी वसूल करण्यासाठी ही मोटर लावली गेली होती.'' 

या शंभर कोटींच्या मागणीमागील मास्टरमाईंड शोधण्याची गरज आहे. त्यासाठी देशमुख यांनी राजीनामा द्यावा व केंद्राने राज्यात राष्ट्रपती राजवट लावावी, अशी मागणी पाचपुते यांनी केली. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post