पंढरपूरात भाजप व राष्ट्रवादीचे उमेदवार अडचणीत,

 पंढरपूरात भाजप व राष्ट्रवादीचे उमेदवार अडचणीतपंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांसमोर नवी अडचण निर्माण झाली आहे. अपक्ष उमेदवार माऊली हळणवर यांनी दोन्ही उमेदवारांच्या अर्जावर आक्षेप घेतला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके आणि भाजपचे उमेदवार समाधान आवताडे अध्यक्ष असलेल्या दोन्ही कारखान्यांवर आरआरसीची कारवाई झाल्याचा मुद्दा हळणकर यांनी उपस्थित केलाय. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके आणि भाजपचे उमेदवार समाधान आवताडे हे अध्यक्ष असलेल्या दोन्ही कारखान्यांवर आरआरसीची कारवाई झाली आहे.  दोन्ही उमेदवारांचा अर्ज शेतकऱ्यांचे थकबाकीदार म्हणून रद्द करण्यात यावा अशी मागणी अपक्ष उमेदवार माऊली हळणकर यांनी केली आहे. दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याबाबतचा निर्णय राखून ठेवला आहे. यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी आणि भाजपच्या उमेदवारांचे अर्ज मंजूर केले तर मुंबई उच्च न्यायलयात दाद मागणार असल्याचंही हळणकर यांनी स्पष्ट केलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post