मोठी बातमी...करोनामुळे परीक्षा देता न आल्यास जूनमध्ये विशेष परीक्षेची व्यवस्था

मोठी बातमी...करोनामुळे परीक्षा देता न आल्यास जूनमध्ये विशेष परीक्षेची व्यवस्था

 


मुंबई : 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. राज्यातील कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागानं एक महत्वाचा निर्णय घेतलाय. कोरोनामुळे 10वी, 12 वीचे जे विद्यार्थी  नियोजित वेळेतील परीक्षा देऊ शकणार नाहीत, त्यांच्यासाठी जूनमध्ये विशेष परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यार्थी कोरोनाबाधित असेल, विद्यार्थ्याच्या घरात किंवा परिसरात कोरोना रुग्ण असतील, तसंच तो राहत असलेला विभाग सील केला असेल, अशा विद्यार्थ्यांना आता परीक्षा देता येणार नाही. त्यामुळे त्यांची जूनमध्ये विशेष परीक्षा घेतली जाणार आहे.10 वीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे दरम्यान ऑफलाईन पद्धतीनं होणार आहे. तर 12 वीची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे यादरम्यान होईल. या परीक्षेला विद्यार्थी बसू शकला नाही तर संबंधित शाळांनी त्या विद्यार्थ्यांची माहिती शिक्षण मंडळाला द्यायची आहे. अशा विद्यार्थ्यांना जूनमध्ये परीक्षा देता येणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post