‘अन्याय करणार नाही व अन्याय खपवूनही घेणार नाही’ हे ब्रीद जपणारे ‘अनिलभैय्या’


‘अन्याय करणार नाही व अन्याय खपवूनही घेणार नाही’ हे ब्रीद जपणारे ‘अनिलभैय्या’नगर : शिवसेनेचे दिवंगत नेते अनिल राठोड यांच्या जयंतीनिमित्त शहर शिवसेनेने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. यानिमित्त अनेकांनी अनिलभैय्या यांच्या आठवणींना उजाळा दिला. नगरमधील ज्येष्ठ साहित्यिक प्रा.जवाहर मुथा यांनीही फेसबुकवर आपल्या भावना करताना राठोड यांच्या स्मृतीला अभिवादन केले आहे. कुठलाही अहंकार नसलेला आणि आपला जन्मच मुळी लोकांसाठी झालेला आहे असे समजणार्‍या  अनिल भैया यांच्या जाण्याने शिवसेनेतील एक अत्यंत विश्वासू सहकारी, कट्टर शिव-नेता आपण  गमावला आहोत, अशा भावना मुथा यांनी व्यक्त केल्या आहेत.

वाचा जवाहर मुथा यांची संपूर्ण पोस्ट 

आज भैया असते तर 'आज'ला अजून जिवंतपणा आला असता..खरे तर त्याची आठवण येणार नाही, असा तो वाढदिवस नसतो.. अनिल भैयांचे अकल्पित जाणे अनाकलनीय नसले तरी अविश्वसनीय होते.. गेली पन्नासेक वर्षे मी त्यांना खूप जवळून पहात आलो आहे.. एक निघड्या जातिचा निष्ठावान शिवसेना नेता म्हणून जनता त्याना ओळखत होती.. अन्याय करणार नाही व अन्याय खपवून घेणार नाही, हे ब्रीद ठेऊन ते शिवसेनेचे कार्य अव्याहतपणे करीत होते.. कसलेही प्रलोभन न घेता सतत न्यायाच्या बाजुने त्यानी अग्रक्रमाने कार्य केले..अहमदनगर मतदार संघात सतत पांच वेळा जनतेने त्याना निवडून दिले होते.. शिवसेनाप्रमुख हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा नितांत विश्वास त्यानी संपादन केला होता. म्हणूनच युती सरकारच्या काळात त्याना मंत्रीमंडळात समाविष्ट केले गेले होते.. अनिल भैया राठोड म्हणजे हिंदुत्वाचा बुलंद आवाज होते. रस्त्यावर स्वत: उतरून लोकांच्या प्रश्नांसाठी काम करणे या त्यांच्या स्वभावामुळे त्यांनी शिवसेना नगर जिल्ह्यात अक्षरश: रुजविली. .लोकांसाठी आंदोलने केली, त्यांच्या समस्यांची तड लावली. . नगर शहरात तर त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले आणि ते यशस्वी करून दाखवले.. नगर जिल्ह्यातून २५ वर्षे सतत आमदार म्हणून निवडून येत असले तरी रस्त्यावरचा सामान्य कार्यकर्ता अशी ओळख सांगण्यात त्यांना अभिमान होता.. भारतीय ज्योतिष शास्त्र व संस्कृती यावर त्यांचा प्रगाढ विश्वास होता..माझ्याशी अनेकदा त्यावर ते चर्चा करीत असत.. कुठलाही अहंकार नसलेला आणि आपला जन्मच मुळी लोकांसाठी झालेला आहे असे समजणाऱ्या अनिल भैया यांच्या जाण्याने शिवसेनेतील एक अत्यंत विश्वासू सहकारी, कट्टर शिव-नेता आपण गमावलो आहोत ..आज त्यांच्या प्रथम जयंती दिनी त्यांचे स्मरण होणे अपरिहार्य आहे..त्याना अत्यंत विनम्रतापूर्वक मी भावपूर्ण अभिवादन करतो...त्यानिमित्त आयोजित चि.विक्रमच्या सर्व कार्यक्रमाना मी शुभेच्छा देतो...0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post