रासायनिक खते, किटकनाशक टाळून भरघोस उत्पन्नाची हमी...'मल्टीप्लायर'ची जादू

 सेंद्रीय शेतीसाठी कृतीयुक्त चळवळ राबवणारे कृषीदूत गणेश सानप, रासायनिक खते, किटकनाशक टाळून भरघोस उत्पन्नाची हमी
नगर (सचिन कलमदाणे) : करोना काळात सर्वात चांगला बदल कोणता झाला असेल तर प्रत्येक जण आहारविहाराबाबत अधिक सजग झाला आहे. चांगला आहार, चांगली दिनचर्याच आपल्या विविध रोगांपासून वाचवू शकते हे सगळ्यांना कळून चुकले आहे. आता चांगल्या आहारासाठी उत्पादनेही तशीच कसदार हवीत. त्यामुळेच भारतात सध्या विषमुक्त शेतीची, सेंद्रीय शेतीची चर्चा होत असून हा उद्देश समोर ठेवून नगरमधील युवक गणेश सानप यांनी ऑरगॅनिक भारत अभियानात सक्रिय सहभाग नोंदवला आहे. वर्षानुवर्षे शेतीत रासायनिक खते, किटकनाशकाचा सर्रास वापर केल्याने जमिनीचा पोत बिघडला आहे. अधिक उत्पादनासाठी रसायनांचा वापर वाढल्याने उत्पादनही तितके कसदार राहिलेले नाही. यासाठीच सानप यांनी एका ध्येयाने शेती व्यवस्थेत जास्तीत जास्त सेंद्रीयता आणण्यासाठी व्यापक प्रयत्न सुरु केले आहेत.  आत्ताचा डब्ल्यूएचओ सर्व्हे सांगतो, मनुष्य एका वर्षामध्ये 1 किलो 700 ग्रॅम खत आणि 900 ग्रॅम कीटकनाशक  खातो आहे. या सर्व गोष्टींचा दुष्परिणाम आपल्याला विविध अंगाने भोगावा लागत आहे. कॅन्सरसारखे महाभयानक आजार आणि ज्यांची नावे आपल्याला माहिती नाहीत अशी कितीतरी आजार आज पसरत आहे. उद्याचे भविष्य असलेल्या लहान मुलांच्या आहारात असा विषयुक्त आहार जाणे भयानक आहे. सानप यांच्या संवेदनशील मनाला ही बाब चांगलीच खटकली. यातूनच त्यांनी स्वत: सेंद्रीय शेतीच्या प्रसार, प्रचारासाठी स्वत:ला अक्षरश: वाहून घेतले आहे. यु ट्युब, फेसबुक, पोर्टल सारख्या समाजमाध्यमांचा चपखल वापर करीत सानप यांनी सेंद्रीय शेतीबाबत मार्गदर्शन सुरु केलं. प्रत्यक्ष शेतात जावून ते शेतकर्‍यांना सेंद्रीय शेती व त्यामुळे पिक उत्पादन वाढ, जमिनीचे संरक्षण कसे होते हे समजावून सांगण्यास सुरुवात केली. त्याला शेतकर्‍यांचाही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. यातूनच आज देशभरात हजारो तरूण ऑर्गनिक भारत अभियानात सक्रिय झाले आहेत. मल्टीप्लायरची जादू

या दरम्यान सानप यांनी मल्टीप्लायरसारखे अतिशय उपयुक्त सेंद्रीय उत्पादन शेतकर्‍यांपर्यंत पोहचिवण्यास सुरुवात केली. मल्टीप्लायरच्या वापरातून अनेकांना शेती उत्पादन वाढल्याचा अनुभव आला आहे. रासायनिक खतांचा, किटकनाशकांचा वापर अतिशय कमी करावा लागत असल्याने जमिनीचा कसही वाढत आहे. मल्टीप्लायर वापराचे प्रशिक्षण सानप स्वत: शेतावर जावून देतात. त्यामुळे आज सानप हे सेंद्रीय शेतीचे अग्रणी दूत बनले आहेत. सेंद्रीय शेतीतून उत्पादन वाढीसाठी उत्सुक असलेल्या शेतकर्‍यांनी अधिक माहिती व प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी सानप यांना आवर्जून संपर्क साधावा. मो. 8275921244, 9767981244

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post