एमपीएससीची परीक्षा पुढे ढककली, सत्यजित तांबे भडकले, निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी

एमपीएससीची परीक्षा पुढे ढककली, सत्यजित तांबे भडकले, निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी

 


राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर येत्या रविवारी होणारी एमपीएससीकडून घेण्यात येणारी नियोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परिपत्रक काढून याबाबत माहिती दिली आहे. 


राज्यामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्याववर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांनी निर्बंध लावलेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सेवा पूर्व परीक्षा घेणे योग्य नसल्याने सदर परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे, असं आयोगाने म्हटलं आहे. कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे एमपीएससीच्या परीक्षा मागील वर्षभरापासून रखडल्या आहेत. याआधी एप्रिल, सप्टेंबर 2020 मध्ये होणार होती ती पुढे लांबणीवर पडली.  दरम्यान, परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये तीव्र पडसाद उमटले आहेत. पुण्यात अनेक विद्यार्थी रस्त्यावर उतरुन या निर्णयाचा विरोध करीत असताना युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनीही व्टिट करीत निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे. ‘‘एमपीएससीची परीक्षा अचानकपणे पुढे ढकलण्याचा जो निर्णय आज झाला आहे, त्याचा मी जाहीर निषेध करतो. करोनाचे संकट कितीही मोठे असले तरीही अशा पध्दतीने अचानकपणे परीक्षा पुढे ढकलून काय साध्य होणार आहे ?  ह्या निर्णयावर तातडीने फेरविचार झालाच पाहीजे,’’ असे व्टिट तांबे यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post