नायब तहसीलदार म्हणून निवड होवूनही तरूणावर शेतात मजुरी करण्याची वेळ

नायब तहसीलदार म्हणून निवड होवूनही तरूणावर शेतात मजुरी करण्याची वेळ  मुंबई - एमपीएससीच्या परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.  या दरम्यान, एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पण अद्याप नियुक्ती न मिळालेल्या एका तरुणाने केलेले ट्विट सध्या चर्चेत आले आहे. 

 प्रवीण कोटकर असे या तरुणाचे नाव असून, त्याने एमपीएससीमधून परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्याची ना. तहसीलदार म्हणून निवड झाली. मात्र निवड होऊन दहा महिने झाले तरी त्याला अद्याप नियुक्तीपत्र मिळालेले नाही. त्यामुळे या तरुणावर सध्या मोलमजुरी करण्याची वेळ आली आहे. 

ट्विटरवरून व्यथा मांडताना प्रवीण कोटकर म्हणाला की, MPSC मधून माझी ना. तहसीलदार म्हणून निवड झाली. मात्र १० महिने झाले तरी सरकारने नियुक्ती दिलेी नाही. त्यामुळे सध्या मी शेतमजूर म्हणून काम करतोय. लोकं आम्हाला हसतात आणि सरकरला शिव्या देतात. नियुक्ती कधी मिळणार? असा सवाल त्याने विचारला आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post