नगरमध्ये खासगी प्रयोगशाळांकडून दिले जाणारे करोना चाचणी अहवाल संशयास्पद

 नगरमध्ये खासगी प्रयोगशाळांकडून दिले जाणारे करोना चाचणी अहवाल संशयास्पद

केंद्राने तातडीने नगरला तपासणी पथक पाठवावे,  मनसेचे सुमित वर्मा यांचे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पत्र

नगर : गेल्या वर्षभरापासून जगभर थैमान घालणारी कोरोना महामारी भारतात जानेवारी ते फेब्रुवारी 2021 पर्यंत बर्‍यापैकी आटोक्यात आली होती. पण महाराष्ट्रात आज फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाने अचानक डोकं वर काढल्याने संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. अमरावती जिल्ह्यातील घटनेने सर्वत्र खळबळ उडवली होती. ते म्हणजे फक्त आठ दिवसात हजारोंच्या संख्येने कोरोनाच्या रुग्णांची सकारात्मक अहवाल मध्ये भर झाली. त्या ठिकाणी याची चौकशी केले केली असता नंतर ही बाब समोर आली की 11 प्रयोगशाळांनी खोटे आणि बनावट अहवाल मांडल्यामुळे लोकांच्या जीवाशी व भावनांशी मोठा खेळ झाला. नगरमध्येही खासगी प्रयोगशाळा व शासकीय प्रयोगशाळेच्या करोना चाचणी अहवालात मोठी तफावत आढळून येत आहे. खासगी प्रयोगशाळेत अहवाला सकारात्मक येण्याचे प्रमाण संशयास्पदरित्या जास्त  आहे. त्यामुळे नगरमध्ये केंद्रीय पथक पाठवून खासगी प्रयोगशाळांची तपासणी करावी, अशी मागणी मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी केली आहे. याबाबत त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांना पत्र पाठवले आहे.

याच प्रकारे नगर जिल्ह्यात देखील फक्त पंधरा ते वीस दिवसात हजारोंच्या संख्येने कोरोनाच्या रुग्णांत वाढ झालेली आहे. ही बाब संशयास्पद असून खासगी प्रयोगशाळांमध्ये कोरोना चाचणी केल्यानंतर एक दिवसाच्या आत  रुग्णांना अहवाल मिळतो आणि त्याच रुग्णांना शासकीय प्रयोगशाळेत तपासणी केली असता दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागतो. ज्या रुग्णांना शासकीय प्रयोगशाळेमध्ये तपासणी करून कोरोनाचा अहवाल नकारात्मक ( निगेटिव्ह ) आला आहे त्या रुग्णांना खाजगी प्रयोगशाळेत तोच अहवाल सकारात्मक ( पॉझिटिव्ह ) दिला जातो. या घटना प्रत्यक्षात नगर मध्ये घडल्या आहेत , त्याचबरोबरीने खाजगी प्रयोगशाळेतील रुग्णांचा सकारात्मक अहवालाचा टक्का हा शासकीय प्रयोगशाळेतील अहवाल कितीतरी पटीने जास्त आहे.त्यामुळे केंद्र शासनाला विनंती आहे की, आपण महाराष्ट्रात पर्यायाने नगर जिल्ह्यात होणार्‍या रुग्ण वाढीकडे तात्काळ लक्ष द्यावे आणि नगर जिल्ह्यातील सर्व खाजगी प्रयोग शाळांची चौकशी करण्यात यावी. तसेच ज्या रुग्णांनी खाजगी प्रयोगशाळेत करून तपासणी केली त्याच रूग्णांनी शासकीय प्रयोग शाळेत सुद्धा तपासणी करावी अशा प्रकारचे आदेश जर आरोग्य मंत्रालयाने दिले तर अनेक प्रयोगशाळांचे पितळ उघडे पडण्याची शक्यता आहे. कृपया या प्रकरणाची केंद्रीय चौकशी समिती नगरला पाठवून त्यांच्या द्वारे गंभीरपणे चौकशी करावी ही आपणास नम्र विनंती.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post