माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांना प्राधान्याने कोविड लस द्यावी

माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांना प्राधान्याने कोविड लस द्यावी
 शिक्षक आमदार दराडे यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदनअहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत असताना जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांना प्राधान्याने कोविड लस देण्याच्या मागणीचे निवेदन  शिक्षक आमदार किशोरभाऊ दराडे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना दिले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली. यावेळी माध्यमिक शिक्षक संघटनेचे आप्पासाहेब शिंदे, सुनील दानवे, महेंद्र हिंगे, वैभव सांगळे आदी उपस्थित होते.
अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये देखील शिक्षक विद्यादानाचे कार्य करीत असून, त्यांना प्राधान्याने कोविड लस देण्याची गरज असल्याची भावना शिक्षक आमदार किशोरभाऊ दराडे यांनी व्यक्त करुन सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post