नवीन स्मार्टफोन लाँच..दमदार बॅटरी, किंमत फक्त 6 हजार 999

  नवीन स्मार्टफोन लाँच..दमदार बॅटरी, किंमत फक्त 6 हजार 999जिओनी कंपनीने आपला आणखी एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. Gionee Max Pro स्मार्टफोनला भारतात लाँच करण्यात आले आहे. या फोनमध्ये 6000mAh बॅटरी आणि 13MP कॅमेरा दिला आहे. Gionee Max Pro ला ई-कॉमर्स फ्लिपकार्टवर लाँच करण्यात आले आहे. या फोनची विक्री ८ मार्च पासून सुरू करण्यात येणार आहे. भारतात याची किंमत सिंगल व्हेरियंट ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजसाठी ६ हजार ९९९ रुपये ठेवली आहे. या फोनला ब्लॅक, ब्लू, आणि रेड या तीन कलर पर्यायात बाजारात उतरवले आहे. ड्यूअल सिम (नॅनो) सपोर्ट असलेल्या या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉयड १० दिला आहे. या फोनमध्ये २.५ डी कर्व्ड ग्लास स्क्रीन प्रोटेक्शन दिला आहे. या फोनमध्ये ६.५२ इंचाचाच फुल व्ह्यू ड्यू ड्रॉप डिस्प्ले दिला आहे. यात ३ जीबी रॅम सोबत ऑक्टा कोर यूनिसोक ९८६३ ए प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये रियर मध्ये ड्यूअल कॅमेरा सेटअप दिला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा १३ मेगापिक्सलचा आहे. तसेच यात २ मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post