महिला दिनी कॅलिफोर्नियात भारतीय महिलांचा सन्मान

 महिला दिनी कॅलिफोर्नियात भारतीय महिलांचा सन्मान

भारतीय महिलांची जगाच्या पाठीवर आघाडी -प्रा. माणिक विधाते


अहमदनगर (प्रतिनिधी)- जागतिक महिला दिनानिमित्त अमेरिकेतील कॅलिफोर्नियात विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या भारतीय कर्तृत्ववान महिलांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सन्मान करण्यात आला. राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनी आहिरे (मालेगाव), राजमाने (पुणे), शिंदे (अहमदनगर), महाजन (भुसावळ), तन्वी (बारामती), मारिया (दिल्ली) यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. यावेळी राहुल शिंदे, सुधाकर महाजन उपस्थित होते.
प्रा. माणिक विधाते म्हणाले की, भारतीय महिलांनी जगाच्या पाठीवर आघाडी घेतली असून, विविध क्षेत्रात आपले कर्तृत्व सिध्द करीत आहे. देशाच्या जडण-घडणीसह आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय महिलांना आदराचे स्थान आहे. हे सर्व शिक्षणाने शक्य झाले असून, याचे श्रेय महिला शिक्षनाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांना जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आमदार संग्राम जगताप व अरुणकाका जगताप यांच्या वतीने कॅलिफोर्नियातील सर्व भारतीय महिलांना महिला दिनाच्या   शुभेच्छा दिल्या.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post