एप्रिलमध्ये राज्यात टोटल लॉकडाऊन?....आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे संकेत

एप्रिलमध्ये राज्यात टोटल लॉकडाऊन?....आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे संकेत जालना : महाराष्ट्रात  कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. औरंगाबाद , नांदेड, नागपूर, बीड, अमरावतीमध्ये मिनी लॉकडाउन लावण्यात आला आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 2 एप्रिलनंतर राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन लॉकडाउनचा  निर्णय घेतली, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे   यांनी दिली आहे.

न्यूज 18 लोकमतशी बोलत असताना राजेश टोपे यांनी राज्यात वाढत चाललेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येवर चिंता व्यक्त केली आहे.

'राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे स्थानिक परिस्थिती आणि सोयीसुविधा पाहून जिल्हे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक जिल्ह्यात प्रशासनाला निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये 5 दिवस तर काही ठिकाणी 8 ते 10 दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला आहे. तर काही ठिकाणी नाईट कर्फ्यु लावला आहे. मात्र ICMR च्या नियमाप्रमाणे किमान 15 दिवसांचा लॉकडाऊन गरजेचा असतो. तरच कोरोनाची साखळी तुटेल. कोरोना रुग्ण बरा होण्याला 15 दिवस लागतात, अशी माहिती टोपे यांनी दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post