लिपिकवर्गीय कर्मचार्‍यांच्या प्रश्नांबाबत 17 मार्च रोजी आढावा बैठक जि.प.मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांचे संघटनेला आश्वासन

 लिपिकवर्गीय कर्मचार्‍यांच्या प्रश्नांबाबत 17 मार्च रोजी आढावा बैठक

जि.प.मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांचे संघटनेला आश्वासन


नगर : लिपिकवर्गीय कर्मचार्‍यांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी जि.प.लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेने केली आहे. याबाबत संघटनेच्यावतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे राज्य सचिव अरूण जोर्वेकर, शिवहरी दराडे आदी उपस्थित होते. क्षीरसागर यांनी लिपिकवर्गीय लिपीकवर्गीय कर्मचार्‍यांच्या प्रश्नावर दिनांक 17 मार्च रोजी आढावा बैठक घेऊन प्रश्न निकाली काढणेत येतील असे आश्वासन दिले.
लिपीकवर्गीय कर्मचार्‍यांचे पदोन्नती,आश्वासीत प्रगत योजनेचे राहीलेले लाभ मंजूर करणे, प्रशासकिय व विनंती बदल्यांबाबत धोरण निश्चीत करुन विनंती बदल्या करणे, प्राधान्य क्रम व खास बदल्या, गोपनिय अहवाल पुर्नविलोकन करुन मिळणे, प्राथमिक आरोग्य केंद्रातील लिपिकांच्या अडचणी सोडविणे, शिक्षण विभागातील,महिला बालकल्याण विभागातील लिपीकांच्या अडचणी सोडविणे, लिपिकांना आदर्श कर्मचारी पुरस्कार देणे, वैद्यकीय देयकांना मंजुरी देणे, सादील व प्रवास भत्त्यासाठी अनुदान मिळणे, लिपिकवर्गीय कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देणे, मराठी हिंदी भाषा सुट मिळणे, डीसीपीएस/भनिनि स्लिपा मिळणे ,डीसीपीएस राज्य हिस्सा मिळणे, सेवार्थ वेतन प्रणातीलमधील अडचणी सोडविणे तसेच सातवे वेतन आयोगाचे वेतन निश्चितीबाबत पडताळणी करणे आदी प्रश्नांचे निवेदन देण्यात आलेले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लिपिकांचे प्रश्नाबाबत दखल घेतल्याबददल संघटनेचे विभगीय अध्यक्ष  अशोक कदम , सचिव विकी दिवे ,कोषाध्यक्ष भरत घुगे,जिल्हा प्रवक्ता कल्याण मुटकुळे,उपाध्यक्ष संदिप मुखेकर , किशोर कुरकुटे,स्वाती पिचड, संघटक सुधीर खेडकर, प्रशांत दरंदले, कार्याध्यक्ष गणेश तोटे, संतोष खैरनार ,संदिप अकोलकर आदीनी आभार मानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post