भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा मोर्च्या जिल्हा कार्यकारणीच्या "सचिव"पदी अर्चना खर्डे यांची नियुक्ती

 भारतीय जनता पार्टीच्या  जिल्हा मोर्च्या जिल्हा कार्यकारणीच्या "सचिव"पदी  अर्चना  खर्डे यांची नियुक्तीअहमदनगर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या  जिल्हा मोर्च्या जिल्हा कार्यकारणीच्या "सचिव"पदी शिर्डी मतदार संघातील कोल्हार येथिल अर्चना पंढरीनाथ खर्डे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली .          संगमनेर येथे नुकतेच जिल्ह्या कार्यकारणी ची बैठक झाली व त्या बैठक जिल्हा कार्यकारणी प्रदेश अध्यक्षा उमताई खापरे व रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ धनश्री ताई विखे पाटील ,माजी आ स्नेहलता कोल्हे व संघटक सरचिटणीस दीपाली मोकाशी व जिल्ह्या अध्यक्षा ऍड सोनाली नाईकवाडे यांच्या उपस्थित संपन्न झाली.त्या बैठक कित निवड करण्यात आली. त्यांच्या निवडी बद्दल भाजपचे जेष्ठ नेते आ राधाकृष्ण विखे पाटील, जि प माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील ,खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील, व रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ धनश्रीताई विखे पाटील यांनी अभिनंदन केले.या निवडी प्रसंगी सौ अर्चना खर्डे यांनी विखे पाटील कुटुंबियांनी आमच्या वर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाने मी काम करेल व त्याच्या मार्गदर्शन खाली मी महिलांचे मोठे संघटन उभे करून पक्ष वाढविण्यासाठी मी काम करिन.या बैठकीला भाजपचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गोंदकर,जिल्हा संघटक सरचिटणीस नितीन दिनकर,युवा मोर्च्या चे जिल्हा अध्यक्ष साईराज डेरे, सुनील वाणी, माजी जि प सद्स्य , कांचन मांढरे,अकोला प स सभापती पुष्प भांगरे, शिर्डी नगरपरीषदेच्या नगरसेविका वंदना गोंदकर,तसेच भाजपच्या महिला पदाधिकारी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post