....तर ठाकरे सरकार पडू शकते

....तर ठाकरे सरकार पडू शकते...कंगना रनौतचा निशाणा मुंबई: प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके सापडल्याप्रकरणी तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर एपीआय सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. एनआयएने सांगितल्यानुसार, सचिन वाझे यांना आईपीसीच्या कलम 286, 465, 473, 506(2), 120 बी आणि 4 (ए)(बी)(आय) स्फोटक वस्तू कलम 1908 अंतर्गत अटक करण्यात आली आहे.  सचिन वाझेंच्या अटकेनंतर कंगना ट्विट करत म्हणाली की, माझा अनुभव मला सांगतोय या प्रकरणात मोठं षडयंत्र रचलं जात आहे. शिवसेना सत्तेत आल्यानंतरच याच पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं. जर या प्रकरणाचा योग्य तपास केला गेला तर आरोपी नक्कीच सापडतील अन् तसं झालं तर शिवसेनेचं सरकार देखील पडू शकतं. माझ्याविरोधात आणखी 200 गुन्हे लागू शकतात. याची मानसिक तयारी देखील मी केली आहे, असं ट्विट कंगना रणौतने केलं आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post