हिरन यांच्या हत्येची घटना हे गृहखात्याचे अपयश

हिरन यांच्या हत्येची घटना हे गृहखात्याचे अपयश -  आ.राधाकृष्ण विखे पाटीलमुंबई दि.८ प्रतिनिधी - श्रीरामपूर येथील व्यापारी गौतम हिरण   यांच्या हत्येच्या घटनेबाबत गृहमंत्र्यानी तातडीने निवेदन करावे आशी मागणी विरोधी पक्षनेते ना देवेंद्र फडणवीस यांनी केली.हिरन यांच्या हत्येची घटना हे गृहखात्याचे अपयश असून,गुंडावर नाही तर, सामान्य माणसांवरच पोलीसांची दहशत अधिक दिसत असल्याची घणाघाती टिका भाजपाचे जेष्ठ नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

श्रीरामपूर येथील व्यापारी गौतम हिरण  यांच्या हत्येच्या घटनेचे पडसाद विधासभेत उमटले.विरोधी पक्षनेते ना.देवेंद्र फडणवीस आणि आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी हिरेन यांची हत्या म्हणजे  गृहविभागाचे नियंत्रण राहीले नसल्याचा थेट आरोप केला.
      गृहखात्याचे कोणतेही नियंत्रण आता  गुंडावर तर फक्त  सामान्य माणसांवर आहे. मुबईत आपले प्रश्न घेवून येणाऱ्यांना पोलीस धाक दाखवितात.मूठभर लोकांमुळे गृहखाते बदनाम होत असल्याकडे लक्ष वेधून आ.विखे पाटील म्हणाले की,हिरन यांचे  अपरहण झाल्यानंतर पोलीस प्रशासनास व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने सर्व माहीती दिली होती.परंतू याबाबत गांभीर्य न दाखविल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.या राज्यात आता आमदारांनाही फेसबुकवरून धमक्या येवू लागल्या असतील तर गृहविभागाची सायबर शाखा काय करते असा प्रश्नही आ.विखे पाटील यांनी उपस्थित केला.
 
      गौतम हिरण  यांचे वडील   स्वातंत्र्य सेनानी होते आशा कुटूंबितील व्यक्तीची हत्येची  घटना  निषेधार्ह असून याची तातडीने चौकशी करावी आशी मागणी आ.विखे पाटील यांनी केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post