25 लाखांच्या निधीचा अपहार, तत्कालिन सरपंच, ग्रामसेवकावर गुन्हा दाखल

 


25 लाखांच्या निधीचा अपहार, तत्कालिन सरपंच, ग्रामसेवकावर गुन्हा दाखलनगर : ः संगमनेर तालुक्यातील  सारोळे पठार ग्रामपंचायतीत 2014 -15 ते 2017-18 या काळात सुमारे 25 लाख रुपयांच्या शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी, माजी सरपंच व तत्कालीन ग्रामसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. माजी सरपंच प्रशांत गवराम फटांगरे व तत्कालीन ग्रामसेवक सुनील शेळके अशी त्यांची नावे आहेत. याबाबत विस्तार अधिकारी सुनील माळी यांनी फिर्याद दिली. याबाबत सुरवातीला अमित फटांगरे यांनी तक्रार केली होती. त्यानुसार चौकशीसाठी गटविकास अधिकाऱ्यांनी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली. समितीच्या अहवालानुसार वरील दोघांनी शासकीय निधीचा अपहार केल्याचे समोर आले.

या बाबत म्हणणे मागितले असता, सरपंचांनी ते सादर केले नाही. माजी सरपंच फटांगरे यांनी 11 लाख 72 हजार रुपये स्वतःच्या नावाने धनादेश काढून घेतले. तसेच संयुक्त जबाबदारी असलेल्या बॅंकखात्यातून काढलेल्या रकमेतील 50 टक्के रकमेलाही त्यांना जबाबदार धरले आहे. अशा प्रकारे फटांगरे यांनी 16 लाख 13 हजार, तर ग्रामसेवकाने 9 लाख 8 हजार, असा एकूण 25 लाख 21 हजार रुपयांचा अपहार झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post