सोने आणि चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण

 सोने आणि चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून सोने आणि चांदीच्या दरात झालेल्या वाढीमुळे ग्राहकांच्या चिंतेत भर पडली होती. अनेक सामान्य ग्राहकांना सण-उत्सव, लग्न-समारंभाच्या निमित्ताने सोने खरेदी करण्यासाठी खिसा मोठ्या प्रमाणावर रिकामा करावा लागत होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोने खरेदीसाठी इच्छुक असलेल्या ग्राहकांसाठी सध्या सोन्याचा भाव १२ हजारांनी स्वस्त आहे. कोरोना लसीकरणाला सुरुवात, अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्कात केलेली कपात आणि भांडवली बाजारातील तेजी या घटकांमुळे सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाल्याचे सांगितले जात आहे. आताच्या घडीला बाजारात सोन्याचा भाव ४४ हजार रुपयांच्या आसपास आहे. ऑगस्ट २०२० मधील विक्रमी किमतीच्या तुलनेत सोने सध्या १२ हजार रुपयांनी स्वस्त आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post