सोन्याचे दर गेल्या 11 महिन्यातील निचांकी स्तरावर, 12000 रुपयांची घसरण

सोन्याचे दर गेल्या 11 महिन्यातील निचांकी स्तरावर, 12000 रुपयांची घसरण नवी दिल्ली: सोन्याच्या दरात  मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी वाढ झाली आहे.  आज व्यवहार सुरू झाल्यानंतर सुरुवातीला 22 कॅरेट सोन्याचे भाव 160 रुपयांनी वाढून 43,680 रुपये प्रति तोळा झाले आहेत. सोमवारी सोन्याचे दर 43,520 रुपये प्रति तोळा होते. एमसीएक्सवर सोन्याची वायदे किंमत  44,360 प्रति तोळा होती, तर चांदीचे दर  वाढून 0.5 टक्क्यांनी वाढून 66,202 प्रति किलो झाले आहेत.

सोन्याचे दर गेल्या 11 महिन्यातील निचांकी स्तरावर पोहोचले आहेत. ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर 56,200 रुपये प्रति तोळाच्या रेकॉर्ड स्तरावर पोहोचले होते. या स्तरावरुन आतापर्यंत सोन्याच्या दरात 12000 रुपयांची घसरण झाली आहे.

1/Post a Comment/Comments

Post a Comment

Previous Post Next Post