प्रेमविवाहाने संतप्त सासऱ्याचा जावयावर खूनी हल्ला

 प्रेमविवाहाने संतप्त सासऱ्याचा जावयावर खूनी हल्ला



नेवासा (गणेश मुळे):-  मुलीने आंतरजातीय विवाह केल्याचा राग आल्याने पाथर्डी येथील माणिकराव खेडकर यांनी आपल्या नातेवाईकांसह नेवासा येथे येऊन आंतरजातीय विवाह केलेल्या आपल्या जावयास त्यांच्या घरासमोर जिवे मारण्याचा प्रयत्न केला . नेवासा येथील प्रशांत राजेंद्र वाघ याचा व पाथर्डी येथील  माणिक खेडकर यांच्या मुलीसोबत १ मार्च रोजी आंतरजातीय विवाह झाला . या विवाहाला खेडकर कुटुंबीयांचा विरोध होता . शनिवारी दुपारी नेवासा पोलिस स्टेशनपासून काही अंतरावरील कडू गल्ली येथे वाघ यांच्या घरासमोर तीन - चार चारचाकी वाहने आली . एका गाडीतून मुलीचे वडील माणिक खेडकर , भाऊ ऋषिकेश खेडकर तसेच एक अनोळखी खाली उतरले . दरवाज्यात उभ्या असलेल्या प्रशांतवर हत्याराचा वार केला . परंतु मोटारसायकल मध्ये असल्याने वार चुकला . त्यामुळे प्रशांतचा जिव वाचला तसेच प्रशांत मोठ्याने ओरडत घरात पळाला . यावेळी मुलीच्या भावाने त्याच्यावर पिस्तुल रोखला तसेच इतर गाड्यातून आलेल्या व्यक्तीच्या हातात चाकू , रॉड , एअर गन होते . यावेळी याला मारा , सोडू नका , असे माणिकराव खेडकर ओरडून सांगत होते . प्रशांतच्या ओरडण्याने गल्लीतील लोक जमा झाले . हे पाहून आरोपी आपापल्या गाड्यांत बसून नेवासा फाट्याच्या दिशेने पळाले . या घटनेची माहिती प्रशांतने पोलिस स्टेशनला फोन करून दिली . पोलिसांनी तत्परता दाखवून भानसहिवरा रोडवर हॉटेल सावताजवळ आरोपींना पकडले . पोलिसांनी तीन गाड्यांसह सात जणांना ताब्यात घेतले आहे . परंतु माणिक कोंडिबा खेडकर , ऋषिकेश खेडकर व त्यांचा भाऊ हे वेगळ्या वाहनाने फरार झाले , अशी फिर्याद प्रशांत वाघ याने नेवासा पोलिसाना दिली . सध्या सात जणांविरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला . तपास पोलिस निरीक्षक विजय करे करीत आहेत .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post