विद्यार्थीनीवर अत्याचार करणार्‍या मुख्याध्यापकाला 7 दिवसांची पोलिस कोठडी

 


विद्यार्थीनीवर अत्याचार करणार्‍या मुख्याध्यापकाला 7 दिवसांची पोलिस कोठडीसातारा : शालेय मुलीवर अत्याचार करणार्‍या महाबळेश्वरमधील नराधम शिक्षक दिपक ढेबे याला न्यायालयाने सात दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे. 8 मार्च रोजी चाईल्ड हेल्पलाईन नंबर 1098 वर कॉल करुन एका विद्यार्थीनीने महाबळेश्वरातील माकरीया या शाळेतील प्राचार्य एका शाळकरी मुलीवर अत्याचार करत असल्याची माहिती दिली होती.  त्या नुसार पोलिसांन पिडीत मुलीचा शोध घेत तीची तक्रार लिहून दिपक ढेबे याला अटक केली. आरोपीने या अगोदर असे काही कृत्य केले आहेत का याची कसून चौकशी केली जात असल्याची माहिती सातारा जिल्हा पोलिस प्रमुख अजयकुमार बन्सल यांनी दिली. आरोपी दिलीप ढेबे याच्यावर महाबळेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post