जिल्हा बँकेकडून साखर कारखान्यांना नियमबाह्य कर्ज, संचालक मंडळावर कारवाई करावी

 


जिल्हा बँकेकडून साखर कारखान्यांना नियमबाह्य कर्ज, संचालक मंडळावर कारवाई करावी : प्रा.तुकाराम दरेकरनगर :  जिल्हा सहकारी बँकेने आपल्या कॅपिटल फंडाच्या जास्तीत जास्त ५० टक्के कर्ज साखर कारखान्यांना देण्याची मर्यादा आहे. मात्र, अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेने जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांना ही मर्यादा न पाळता नियमबाह्य कर्जे दिलेली आहेत. रिझर्व्ह बँक आणि नाबार्ड यांनी या कर्जाची चौकशी करून कार्यकारी संचालकांसह जिल्हा बँकेच्या संचालक मंडळावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी श्रीगोंदा तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष प्रा. तुकाराम दरेकर यांनी केली आहे.

दरेकर म्हणाले, जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांना सेक्टरल मर्यादा पाळून बँकेच्या कॅपिटल फंडाच्या जास्तीत ५० टक्के इतके कर्ज वितरित करता येते. प्रत्यक्षात जिल्हा बँकेने कॅपिटल फंडाच्या ५० टक्क्यापेक्षा जास्त कर्ज दिले आहे. त्यांनी नाबार्डने घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली केलेली आहे. ही बाब गंभीर असून याबाबत नाबार्डने चौकशी करावी. नाबार्डचे नियम डावलून जिल्हा बँकेने अनेक कारखान्यांना आत्तापर्यंत एवढे जादा कर्ज दिलेले आहे की, येथून पुढे या कारखान्यांना नवीन कर्ज देताच येणार नाही, असा आरोप दरेकर यांनी केला आहे.

संस्था पातळीवर सेवा संस्था ७० टक्के कर्जदारांचे कर्ज शंभर टक्के वसूल करते. परंतु, राहिलेले ३० टक्के कर्जदार थकीत असतात. अशावेळी जिल्हा बँक सेवा संस्थांकडून आलेल्या भरण्यामध्ये अगोदर १०० टक्के व्याजाची वसुली दाखविते. त्यामुळे सेवा संस्थांकडे मुद्दल येणे दिसते आणि त्यावर बँकेचे व्याजाचे मीटर चालू राहते. बँकेचा हा कारभार सेवा संस्थांच्या अजिबात हिताचा नाही. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post