महिला अधिकार्‍याची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

महिला अधिकार्‍याची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या


  

अमरावती  : हरिसाल व्याघ्र प्रकल्पातील सिपना वन्यजीव विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी शुक्रवारी (ता. २५) सायंकाळी 7 वाजता हरिसाल येथील सरकारी बंगल्यात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. आत्महत्याचे कारण स्पष्ट झाले नाही.  धारणी तालुक्यातील हरिसाल येथे व्याघ्र प्रकल्पाच्या शासकीय घरात दिपाली चव्हाणचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाइड नोट लिहिल्याची माहिती समोर आली आहे. मात्र त्यातील तपशील कळू शकला नाही. चव्हाण यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती धारणीचे पोलिस निरीक्षक शुभम कुलकर्णी यांनी सांगितले. तपास सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दीपाली चव्हाण यांचे पती अमरावतीला अन्य विभागात कार्यरत आहेत. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post