पोलीस दलामध्ये पैसे खात नाही असा एकही अधिकारी, कर्मचारी नाही

पोलीस दलामध्ये पैसे खात नाही असा एकही अधिकारी, कर्मचारी नाहीमाजी पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. पोलीस दलात असा अधिकारी, कर्मचारी नाही जो पैसे खात नाही किंवा एकही पोलीस ठाणे नाही जिथे पैसे जमा होत नाहीत, असा मोठा दावा माजी पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी केला आहे. 


राज्यात पोलीस प्रशासनात प्रचंड पैसे खाल्ले जात असल्याचा खुलासा बोरवणकर यांनी केला. "असं एकही पोलीस स्थानक नाही ज्या ठिकाणी पैसे जमा होत नाहीत. पोलीस दलामध्ये पैसे खात नाही असा अधिकारी कर्मचारी नाही. प्रत्येक पोलीस स्थाक राजकीय पक्षांची सोय आणि पैसे कमावण्याचा अड्डा झाला आहे. या ठिकाणी राजकारण्यांना हव्या तशा नियुक्त्या केल्या जातात. माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण गेल्यानंतर परिस्थिती बिघडली," असंही बोरवणकर म्हणाल्या. त्यांनी एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीत यावर भाष्य केलं. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post