बळीराजासाठी आनंदाची बातमी...यंदाही चांगल्या पावसाचा अंदाज
मुंबई : गेल्या वर्षाप्रमाणे यावर्षीदेखील जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरला तर शेतकऱ्यांसह देशाच्या अर्थव्यवस्थेला देखील याचा फायदा होईल. कारण भारताची दोन तृतीयांश जनता ही शेतीवर अवलंबून आहे.
ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागाने यावर्षी सर्वसामान्य पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात येतोय. ऑस्ट्रेलियाचं हवामान खातं हे त्याच्या अचूक अंदाजासाठी जास्त प्रसिद्ध आहे. दरम्यान, भारतीय विभागाकडून अद्याप हवामान विभागाबाबत कोणताही अंदाज वर्तवण्यात आलेला नाही. कदाचित एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. याशिवाय एक्यूवेकर या वेदर कंपनीनेनदेखील भारतात यावर्षी दुष्काळ पडणार नाही, असा अंदाज वर्तवला आहे.
Post a Comment