प्रेमसंबंधात अडथळा आणल्याने मुलाने केली आईचीच हत्या...


प्रेमसंबंधात अडथळा आणल्याने मुलाने केली आईचीच हत्या... पुणे : प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या आईची 19 वर्षीय तरुणाने हत्या केली. हत्येसाठी तरुणाच्या 26 वर्षीय प्रेयसीनेही त्याला साथ दिल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर पोलिसांनी प्रेमी युगुलाला बेड्या ठोकल्या. मायलेकाच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे 19 वर्षीय विशाल राम वंजारी हा 38 वर्षीय आई सुशीला राम वंजारीसोबत वढू खुर्दमधल्या माने वस्तीत राहत होते. विशालचे त्याच्यापेक्षा वयाने सात वर्षांनी मोठ्या असलेल्या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. सुशीला वंजारी यांचा मुलाच्या प्रेमसंबंधांना विरोध होता. विशालने प्रेयसी नॅन्सी गॅब्रिअल डोंगरे हिच्या मदतीने आईचा खून केला. मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न त्याने केला.  पोलिसांनी अधिक तपास केला असता विशालवर त्यांचा संशय बळावला. अखेर धारदार शस्त्राने भोसकून आईची हत्या केल्याची कबुली त्याने दिली. या प्रकरणी पुण्यातील लोणीकंद पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post