‘ही’ प्रसिध्द गायिका बांधणार राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’


लोकप्रिय गायिका वैशाली माडे लवकरच करणार राष्ट्रवादीत प्रवेश मुंबई - लोकप्रिय गायिका वैशाली माडे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. 31 मार्चला वैशाली मुंबईतील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या  चित्रपट, कला, साहित्य आणि सांस्कृतिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला याबाबत माहिती दिली आहे. वैशाली यांनी अनेक चित्रपटांत गाणी आणि मराठी मालिकांची 'टायटल साँग' देखील गायली आहेत. 

मराठी बिग बॉसमुळे वैशाली माडे चर्चेत आल्या होत्या. त्यात त्यांनी स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाची चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्या पक्षप्रवेश करणार आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post