भाजीसाठी आणली गोगलगाय... मिळाला कोट्यावधीचा मोती

 भाजीसाठी आणली गोगलगाय... मिळाला कोट्यावधीचा मोतीबँकॉकमधील एका महिलेने भाजीसाठी आणलेल्या गोगलगायच्या माध्यमातून तिचे नशीब फळफळल्याची आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. भाजी करण्यासाठी या महिलेने तब्बल 163 रुपयांची समुद्री गोगलगाय विकत घेतली आणि तिला त्यातून तब्बल कोटय़वधींचा दुर्मिळ मोती सापडला आहे. थायलंडमधील ही घटना असून कोडचाकोर्न असे या महिलेचे नाव आहे. या महिलेने एका विक्रेत्याकडून 163 रुपयांच्या समुद्री गोगलगाय घेतल्या. घरी आल्यावर भाजीसाठी या गोगलगाय साफ करून त्याचे छोटे छोटे तुकडे करताना त्यांना एका गोगलगाईच्या आवरणात केसरी रंगाचा खडा सापडला. या दगडाची व्यवस्थित माहिती घेतल्यानंतर हा दगड नसून दुर्मिळ प्रकारचा 6 ग्रॅम वजनाचा मोती असल्याचे तिला समजले. हा मोती 1.5 सेमी व्यासाचा आहे. त्याची बाजारातील किंमत कोट्यावधी रुपये आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post