बँक गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादीच्या आमदाराला ईडीकडून अटक

बँक गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादीच्या आमदाराला ईडीकडून अटक मुंबई : शिवाजी भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. बँकेमार्फत बेनामी कर्जवाटप केल्याच्या आरोपाखाली पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने यापूर्वीच अनिल भोसले यांना तुरुंगात पाठवले आहे. अनिल भोसले हे राष्ट्रवादीचे विधानपरिषदेवरील आमदार आहेत. भोसलेंसह चौघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत

ईडीच्या मुंबई झोनल ऑफिसने शिवाजी भोसले सहकारी बँकेतील फसवणुकीसंदर्भात कारवाई केली. राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले हे शिवाजी भोसले सहकारी बँकेचे संचालक आहेत. त्यांच्यासह बँकेचे दुसरे संचालक सूर्याजी जाधव, सीईओ तानाजी पडवळ, चीफ अकाऊंटंट शैलेश भोसले यांना अटक करण्यात आली आहे. सध्या अनिल भोसले हे पुण्यातील येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post