नवी कार खरेदी करताना जवळपास ५ टक्क्यांची सवलत

नवी कार खरेदी करताना जवळपास ५ टक्क्यांची सवलत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी जुनी कार स्क्रॅप करण्याची तयारी असलेल्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. जुनी कार स्क्रॅप केल्यास नवी कार खरेदी करताना जवळपास ५ टक्क्यांची सवलत देण्याची घोषणा नितीन गडकरींनी केली आहे. जुनी कार स्क्रॅप करण्याच्या बदल्यात वाहन कंपन्या ग्राहकांना नव्या कार खरेदीवेळी जवळपास ५ टक्के सूट देतील, असं गडकरींनी सांगितलं.वाहनांना स्वेच्छेनं स्क्रॅप करण्याचं धोरण मोदी सरकारनं आणलं आहे. त्याची घोषणा २०२१-२२ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली. या धोरणाबद्दल गडकरींनी अधिक माहिती दिली. 'स्क्रॅप धोरणाचे चार प्रमुख घटक आहेत. सवलतीसोबतच प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर हरित कर आणि अन्य शुल्क आकारण्याची तरतूद यात आहे. त्यांना फिटनेस आणि प्रदूषण चाचणी करून घ्यावी लागेल. त्यासाठी देशात सेल्फ ड्राईव्ह फिटनेस केंद्रांची आवश्यकता भासेल. आम्ही त्या दिशेनं काम करत आहोत,' असं गडकरींनी सांगितलं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post